Tuesday, 20 November 2018

श्रद्धा , सबुरी , अल्लाह मालिक !

जेव्हा तुम्ही नविन विचार मांडता , नविन चिंतन सांगता तेव्हा , त्या क्षणी तुम्ही एकटे पड़ता , समाजा पासून , वर्तमान प्रवाह पासून दूर होता तेव्हा तुमच्या बरोबर कोणीही नसतो फ़क्त तुम्ही आणि तुमचे नविन विचार नविन चिंतन ! परत तुम्हाला समाजा कडे जायचे असते , तुमचे नव विचार , नव चिंतन किती समाज उपयुक्त आहेत आणि समाजाने घेणे जरुरी आहे हे पटवून द्यायचे असते . हे फार जिकरीचे काम असते . कोणी तुमच्या बरोबर येईल काय ? ऐकून घेईल काय ? असे प्रश्न तुम्हाला भेडसावीत असतात . समाज नवीन विचार सहजा सहजी घेत नसतो , तेव्हा तुम्ही एकला चालो रे असे स्वतःला सांगत समाजात वावरत असतात . तुम्ही तुमच्या मताचे ठाम आणि आग्रही असतात , वर्तमानातील सामाजिक ठेकेदार विरुद्ध तुम्ही बोलत असतात आणि अनेकाना ते ऐकून घ्यायचे नसते कारण त्यांचा तुमच्यावर विश्वास नसतो , तुमचे म्हणणे त्यांच्या डोक्यावरून जाते त्या वेळी तुम्ही निराश होऊ शकता हे मी माझ्या अनुभवाने सांगू शकतो तेव्हा तुम्हाला तुमच्या विचारावर अतूट श्रद्धा आणि अथक सबुरी ची गरज असते . पुढे काय होणार हे आपणास माहीत असते आणि म्हणून अल्लाह मालिक म्हणून तुम्ही एक कर्म योगी बनून चालत राहायचे असते . हेच मी माझे नव विचार , नव चिंतन घेऊन चाललो आहे . नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हे ते माझे नवं चिंतन आहे ज्याला मी नेटीव्हीसम आमचा गुरु आहे , नेटिव्ह हिंदुत्व आपले मार्गदर्शन आहे म्हणतो .

नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा निच्चीतच नव चिंतन आहे ,

श्रद्धा , सबुरी आणि अल्लाह मालिक एवढेच माझ्या जवळ आहे !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रूल मोव्हमेन्ट
(नेटिविस्ट राऊत मोव्हमेन्ट)
#NRM

No comments:

Post a Comment