आंबेडकर भवन ते हिंदू कॉलनी इंडिअन एज्युकेशन सोसायटी वाया राज गृह !
माझ्या आयुष्यात विसावी शताब्दी खूप स्थित्यंतरे घेऊन आली. मी आय टी आय , मुंबई शिपिंग आणि क्लेरांस ऑफीसा चा इन चार्जे होतो . एस्सी मॅनेजर होतो पण डेसिग्नशन ब्रिटिश टाईप चे ऑफिसर इन चार्जे असे होते , रिपोर्टींग मानकापूर , गोंडा जिल्हा , उत्तर प्रदेश येथे जेनेरल मॅनेजर ला होती . माझ्या आफिस चे काम होते कॅस्टम मधून माल सोडवून मानकापूर , बंगलोर , नैनी , रायबरेली आदी प्रोडूकशन युनिट ना पाठविणे . कस्टम ड्युटी क्रोरोडोत येत असे . चेक सहीचे पूर्ण पॉवर होते , चार अकाउंट्स ठेवावे लागत होते . पण आता आय टी आय खूप मागे पडली होती . खाऊजा धोरणाने अनेक सरकारी उपक्रम तोट्यात जाऊ लागले होते . आमची उंडरटेकिंग भारतातील पहिली अंडरटेकिंग होती व नाव रत्ना मध्ये कधी काळी येत होती . पण २००० येई पर्यंत कंपनी दाब घाई ला आली होती , पगार थकायला लागले होते . नवीन पे कमिशन लागू होत नव्हते . त्या वेळी मला आपण स्वतंत्र व्यवसाय करावा म्हणून डोक्यात सारखे विचार येत होते .
मी कल्याणला माझ्या बिल्डिंग खाली गाला घेतला पत्नी च्या नावाने , बँके तुन लोन घेतले , कॅश क्रेडिट फॅसिलिटी मिळवून घेतली . प्रोजेक्ट होता छोटे रेस्टारंट . रेस्टोरंट , हॉटेल माझे ड्रीम राहिले आहे . प्रश्न होता कोण चालविणार ? मुले शिकत होती , पत्नी ची फारशी इच्छा नव्हती मी माझी इच्छा त्यांच्यावर लादत होतो !
मग मीच ऐच्छिक निवृती घ्यायचे ठरविले २००२ च्या आगस्ट महिन्यात ती घेतली , वाजवुन सहा वर्ष बाकी होते . जे पैसे मिळाले ते मी बँकेचे कर्ज परत करण्या साठी वापरले . दीड दोन लाख रेस्टोरंट चे साहित्य , नाळ जोडणी , फर्निचर , लायसन्स इत्यादी वर खर्च झाले . रामबाग कल्याण मध्ये निदान आमच्या सारखे चांगले रेस्टोरंट तेव्हा नव्हते . मी रेस्टोरंट ला माझ्या माय चे नाव दिले कृष्णा रेस्टोरंट !
मी वडापाव, उसळ , जलेबी , पेढा , बर्फी , सामोसा बनायला शिकलो , घरचे लोक विशेषतः माझी पत्नी सुद्धा शिकली , नॉन व्हेज जेवणं सुद्धा आम्ही ठेवत असू . आम्हाला काम करणारा फार चांगला स्वयंपाकी मिळाला होता . त्याचे आडनाव केने , आम्ही त्यांना मामा म्हणत असू. मामा मूळचा बाप गाव चा त्यांच्या सासऱ्याची जागा अग्रवाल कॉलेज च्या लोकांनी विकत घेतली होती आणि एक नौकरी , आणि रस्त्याजवळील थोडी जागा यांच्या साठी सोडली होती . काही काळाने मामाने तेथे, चहा , वडापाव , दुकान लावले , तेव्हा सर्व भिस्त आमच्यावर आली . हॉटेल व्यवसायात माणसे भेटणे फार कठीण , टिकून रहाणे तर अजूनच कठीण !
आमचे कृष्णा रेस्टोरंट सुरू झाले , चालायला लागले पण रेसिडेंटिअल भागात असल्या मुळे ,गिर्हाहीक कमी , खर्च जास्त . त्यातच पत्नी आजारी पडली , खूप दवा खाणे फिरणे झाले , खूप खर्च झाला शिवाय रेस्टोरंट बंद ठेवावे लागले ते वेगदेच . पुढे पत्नी ठीक झाली आणि आता उत्तम आहे पण मला परत नौकरी शोधावी लागली .
दैनिक सम्राट त्या वेळी नवीनच सुरू झाले होते . ठाणे तलाव पाळी ला आफिस होते . मी माझा अर्ज , माझी माहीत घेऊन तिथे गेलो , बबन कांबळे साहेब त्या पेपरचे संपादक होते त्यांना भेटलो त्यांना माझा अर्ज दिला त्यांना अकाउंटंट ची गरज होती . मी काम वर रुजू झालो . तिथे बबन कांबळे साहेब सर्व सर्व्ह होते .
मी एक कर्मचारी म्हणूनच तिथे वावरलो . आदी सहकारी संस्था बनवावी असे त्यांचे ठरले होते , पुढे खाजगी कंपनी बनवावी असे ठरविण्यात आले ५० लोकांनी एक एक लाखाचा शेअर घ्यावा असे ठरले . बरेच लोक त्यात सहभागी झाले , कल्याण चे राजा घोडेस्वार , रमेश मेश्राम , डी एल कांबळे, देवरे , निरंजन पाटील , महेंद्र साळवे , एम सी कांबळे अशी हि मोठी मंडळी होती , इतर पैकी माने , हुमणे , पगारे , जाधव , चौकेकर , खोब्रागडे असे आणखी काही लोक होते . स्टाफ मध्ये मी , दुसरे बबन कांबळे, कोळी , वळंजू , शिर्के आदी कर्मचारी होते . तिथे असताना ठाणे रंगायतन मध्ये मोठा भव्य कार्यक्रम झाला होता . पुढे काही दिवसानी सम्राट ला दादर ला आंबेडकर भवन येथ हलविण्यात आले . निकुंभ संपादक मानून आले . पुढे तिथे मानजमेंट आणि संपादक बबन कांबळे यांचा काही वाद विवाद झाले , काही लोकांनी नवीन पेपर काढला , खोब्रागडेंनी अजून एक पेपर काढला . बबन कांबळे नि पुढे ट्रस्ट बनविली असे समजले .
मी नेहमीच स्वतःला या सर्व बाबी पासून दूर ठेवले .कारण स्पस्ट होते मी नेटिविस्ट होतो माझे विचार इथे पटण्या सारखे नव्हते . तरीही एक दा पगारेनी विचारले राऊत तुम्हाला काय वाटते ? मी म्हणालो संपादक , प्रकाशक , मुद्रक वेग्वेगडे ठेवा . मॅनेजमेन्ट टाइम्स ऑफ इंडिया सारखे ठेवा , नवा काळ सारखे नाही !
पुढे काही दिवसांनी इंडियन एडुकेशन सोसायटी ची पेपरात जाहिरात आली मी अर्ज केला तिथे माझी निवळ झाली .
इंडियन एजुकेशन सोसायटी , हिंदू कॉलनी दादर , राजा शिवाजी विद्यासंकुल १०० वर्ष जुनी शिक्षण संस्था आहे . ४० -४५ शाळा , एक म्यानेजमेंट कॉलेज , एक कॉलेज ऑफ आर्टीटेक्ट असा मोठा पसारा . त्याचा कंट्रोल संस्थेचा आणि ते बघणारे अरविंद वैद्य , मनोहर लोटलीकर , माधव मंत्री आणि मी त्यांचे बरोबर काम करण्याचे मज भाग्य लाभले . या संस्थे ची जाहिरात आली मी अर्ज केला निवड झाली . सम्राट मधून इंडियन एडुकेशन सोसायटी वाया राज गृह असा हा प्रवास !
हि सोसायटी १०० वर्ष जुनी , ४०- ४५ शाळा , दोन कॉलेज , मानजमेंट आणि आर्किटेक्ट चे . अध्यक्ष वैद्य सर , सचिव गावस्कर चे मामा माधव मंत्री , रणजी क्रिकेटर , यष्टी रक्षक सर , उपाध्यक्ष व चीफ एक्सक्युटीव्ह आफिसर मनोहर लोटलीकर सर . सर्व फार कडक , अनुशासन प्रिय माझी रोज ची रिपोर्टींग लॉटलीकर सरांना .
ढमढेरे , नायक , वाघ तिथे कार्यजारणीवर , माटुंग्याच्या नायक , जि असं बी मंडळाचे ट्रस्टी , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे सुद्धा सहयोगी .
चार वर्ष मी तिथे सिनिअर अकाउंट्स/ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आफिसर म्हणून काम केले . खूप मदत झाली .
आफिस ला जाताना रोज बाबासाहेब आंबेड्करचे राज गृह लागायचे , त्यांची रोज आठवण यायची , त्यांची पीपल्स एडुकेशन सोसायटी , त्यातील भांडणे मन दुखवून जायची , सम्राट मधील भांडणे मनाला दुखी करायची .
नेटिविस्ट डी डी राऊत
No comments:
Post a Comment