आज रमाबाई आम्बेडकारांचा मृत्य दिन आहे त्यांचे स्मृतीस विनम्र अभीवादन ! 7 फरवरी 1894 – 27 मे 1935 त्यांचा जन्म आणी मृत्यू दिन आहे , त्यांना अल्पायुष लाभले व अतिषय गरीब आणी खड़तर आयुष्य जगावे लागले !
रमाबाई आम्बेडकर ह्या भारतिय संविधान चे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रथम पत्नी !
अस्पृष्य महार समाजात बाबा साहेब भीमराव आम्बेडकर आणी रमाबाई चा जन्म झाला होता !
लग्नाचे समई आम्बेदडकर 15 वर्षाचे तर रमाई 12 ची होती !
परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवऱ्या थापायला वरळीला जात असत. मुल उपशी राहु नये म्हणुन स्वता उपास करत असत !
रमाई दलित समाजातिल महिला सारख्याच कष्टलू होती ! खुटुम्बाला मदत व्हावी या साठी रमाई ने शेंण गोवारी थापून विक्री चा घरगुती उद्योग शुरू केला ! रमाई ला मुलभारतिय गृह उद्योगरत्न ही उपादी देणे सयुक्तिक ठरेल !
No comments:
Post a Comment