Wednesday, 8 January 2025

Mulbhartiya Hindhudharm Bhajani Mndal

कमरावद ,ज़िल्हा नानदूरबार येथील गुलू गण्या पांढरे, कांताबाई गुलू पांढरे, हुरसिंग कायसिंग भिल, इंदूबाई हुरसिंग भिल, हेन्गू नुऱ्या भिल, गुलाब लालसिंग भिल, कमलबाई गुलाब भिल, तुळशीराम दशरथ मालचे, येडीबाई तुळशीराम मालचे, रायसिंग कायसिंग भिल, बापू धुडकू शिंदे, दगा नारायण शिरसाठ, सुमनबाई दगा शिरसाठ, यशवंत मोतीराम कोळी, यमुनाबाई यशवंत कोळी या गावातील महिला व पुरुषांनी एकत्र येत कबीर पंथ साहेब वारकरी भजनी मंडळ स्थापन केले. या मंडळामार्फत अनेक वर्षांपासून गावोगावी शासनाच्या विविध योजनांच्या माहितीसह समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, जनमानसात भक्तिभाव निर्माण व्हावा म्हणून गावोगावी भजनामार्फत जनजागृती करीत आहेत. तालुक्यात अनेक भजनी मंडळ व त्यातील कलावंत मोठ्या प्रमाणात असतानाही ते संघटित नसल्याने त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठीचा विषय आणि त्याला वाचा फुटत नाही. त्यामुळेच त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे.

No comments:

Post a Comment