उच्च विद्दया विभूषित प्रा .भीमराव गोटे यांचा जन्म विदर्भतिल वर्धा ज़िल्हयात तिल एका लहान खेड्यात गरीब शेतकरी मुलभारतिय हिन्दू धर्मात झाला . त्यांनी प्राथमिक शिक्षण मराठी मातृभाषा मधे आणी ज़िल्हा परिषद शालेतुन घेतले आणी उच्च शिक्षण नागपुर विश्वविद्दयालय मधुन अर्थ शास्त्र या विषयात घेतले काहि वर्ष त्यांनी ट्रेडमार्क विभाग मुंबई मधे नौकारी केली व पूढे पुस्तक वेवस्थापन यात स्नातक पदवी मुंबई विद्दयापिठ मधुन मिलविली पूढे शिक्षणशास्त्र यात स्नातक व पदवीत्तर मास्टर ऑफ एज्युकेशन पदवी घेवुन पूढे शिक्षणशास्त्र महाविद्दयालयात उल्हासनगर येथे प्राध्यापक म्हणुन सेवा दिली आणी पूढे शिक्षण शास्त्रात पी एचडी अर्थात विद्दयावाचस्पति ही उच्चतम पदवी घेवुंन ते नागपुर विद्दयापिठात शिक्षण शास्त्र विभाग प्रामुख आणी बाबा साहेब आम्बेडकर विचार ,नागपुर विद्दयापीठ , महात्मा गांधी आंतर राष्ट्रिय हिंदी विद्दयापीठ , वर्धा आणी अनेक खाजगी संस्था चे शिक्षण मार्गदर्षक अशी बहुविध सेवा शिक्षण क्षेत्राला देवुन प्रत्यक्ष निवृत झाले असले तरि वाचन लिखान अविरत शुरूच आहे !
प्रा .गोटे साहेब चिकित्सक वृत्ती चे अभ्यासू समिक्षक आहेत ते साहित्तिक आहेत आणी कवी सुद्धा आहेत !
नेटीव रूल मुव्हमेंट ची स्थापना जरी 1 जानेवारी , 1970 ला पवनी ,भंडारा ज़िल्हा , महाराष्ट्र येथे झाली असली तरी या मुव्हमेंट च्या वैचारिक जडन घडन मधे प्रा . डॉ. गोटे साहीबांचे अत्यंत मोलाचे मार्ग दर्शन आणी सन 1986 पासुन प्रत्यक्ष सहभाग आणी कार्य सिद्धी साठी त्यांचे फार मोठे योगदान आहे ! मुलभारतिय विचार मंच , नेटीव पिपल्स पार्टी अश्या जोखिम च्या वैचारिक आणी राजकिय संस्थेत ते प्राध्यापक असुन स्थापना प्रक्रियेत शामिल झाले ! एकाध्या नौकारी वर असणार्या प्राध्यापकाने आपल्या घरी पक्षाचे रजिस्टर्ड मुख्यालय ठेवावे त्या पक्षाच्या प्रमुख महामंत्री पदाची जबाबदारी घ्यावी या साठी किती प्रचण्ड मानसिक शक्ति या माणसात असावी याची कल्पना करूँन पहा ! खरच ते नेटीव पिपल्स पार्टी चे संस्थापक आहेत !
मुलभारतिय विचार मंच च्या मंचा वरूँन देश्याच्या अर्थसंकल्प वर बोलताना कोंग्रेस आणी डॉ. मनमोहन सिंह यांच्या खा ऊ जा धोरणावर साडकुन टिका करणारे प्रा . गोटे सर हेच पहिले ठरतिल !
गोटे साहेब कल्याण पूर्व ला एका लहानश्या चालवजा घरात आपले कुटुम्ब सौ वंदाना ताई गोटे , दोन लहान मुले , दोन शिकलेले लहान बेरोगार भाऊ आणी म्हतारे आई वडील असे भरगच्च परीवारात एकमात्र कमावती व्यक्ति पूढे त्यांनी प्रिंटींग प्रेस टाकली, प्राध्यापक ची नौकारी करून घरी आले की प्रेस चे मालक कामगार !
घरि नेटीविस्ट डीडी , के जी पाटिल आदि आमच्या सारखे लोक आले की एका मागुन एक काला चहा आणी समाज , राजकारण , धर्म आदि वर न संपनारया गप्पा असे हे नित्य कार्य क्रम 1968 शुरू झाले त्या पूर्वी गोटे साहेब नागसेन मण्डल मधे सकिय पदाधिकारी सचिव होते , हे कल्याण पूर्व चे खूप जुने सामाजिक मण्डल , सार्वजानिक आम्बेड़कर जयंती जोरात साजरी करित असे !
प्रा . गोटे सरांचा पिंड तसा धार्मिकच पाली भाषेवर त्यांचा दाण्डगा अभ्यास आणी म्हणुन त्यांनी त्यांचे एक नाते स्नेही श्री पी टी धनविजय साहेब सोबत एक पाली प्रचार समिती स्थापन केली या संस्थेने पुधे सम्राट शाला काढ़ली . प्रा . गोटे सर कल्याण पूर्व च्या जागृती मंडल चे सुद्धा सभासद होते या संस्थे चे नालंदा विद्दयालय आहे तर श्री देवचन्द आम्बादे साहेब ची संस्था आणी समता विद्दयालय ला सुद्धा मार्गदर्शन करित होते !
पूढे त्यांनी त्यांचे दोन ही भाऊ योग्य मार्गी लावून ते नागपुर ला प्रपाठक म्हणुन गेले थोडे स्थिर स्थावर झाले दोंनही मुले उच्च शिक्षित इंजीनीअर झाले आपला स्वतंत्र व्यवसाय करित आपला संसार निट करित आहेत त्यांना एक नातु आहे .सौ वंदना ताई सुद्धा पालित एम फिल झाल्या व एक प्री स्कुल चालवितात त्या संस्थे चे प्रा गोटे संस्थापक आहेत !
प्रा , डॉ. गोटे सरांचे काम इथेच थांबले नाही तर एक सेवन स्टार कंपनी चे डायरेक्टर आहेत आणी बौद्ध विहार समन्वय समिती चे कार्याध्यक्ष आहेत !
त्यांनी काही वर्षा पासुन शाम होटल , नागपुर जीथे बाबा साहेब आम्बेडकर थांबले होते आणी तीथे ही काही लोकांना बाबा साहेबनी बुद्ध धम्म दीक्षा दिली होती ते शाम होटेल आता धम्म दीक्षा स्मृति भवन व्हावे य़ा साठी अहोरात्र परिश्रम करित आहेत तिथे ही दर वर्षी न चुकता ते धम्म दीक्षा दिनी दिवस भर त्रिशरण पंचशिल पूजा घेत असतात !
गोटे साहेबानी पत्रकारिता क्षेत्रात पाक्षिक काढल संपादक मुद्रक प्रकाशक होते , सहकारी क्षेत्रात काम केल , कामगार क्षेत्रात काम केल रेशन उपभोक्ता संघ , ब्लू व्हिल क्रास अश्या संगटन मधे स्वयम संस्थापक सेवक होते !
गोटे साहेबांचे शिक्षण मोठे आहे , त्यांचे सामाजिक , शैक्षणिक कार्य मोठे आहे त्यांचे राजकिय विचार आणी कार्य मोठे आहे जवल जवल सर्व राजकिय विचार अगदी गांधीवाद मार्क्सवाद समाजवाद , मुलभारतियवाद , फूले आम्बेकरवाद , ब्राह्मण - मनु वाद या सर्व राजकिय सामाजिक विचारावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे ,ते कल्याण ला 2002 साली भरलेल्या प्रथम राष्ट्रिय गांधी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत त्या संम्मेलनाला माहत्मा गांधी चे पणतु तुषार गांधी आदि अनेक गांधीवादी मान्यवर पाहुणे वक्ते उपस्थित होते , एवढेच नव्हे तर ते एका काटे वजन कारागीर ट्रेड युनियन चे संस्थापक सुद्धा राहिले आहेत आणी त्या साठी त्यांना भ्रस्टाचारी वेवस्थेने अतोनात त्रास सुद्धा दिला आहे ! नेटीव पीपल्स पार्टी चालविताना पक्षाचे माजी आमदार पप्पु कलानी यांना आपनास या पुढे पक्ष टिकिट देणार नाही असे सांगण्याची धाडसी वृत्ती त्यांच्या कडे आहे म्हणुन ही आम्ही त्यांना बोधिसत्व आहेत असे म्हणत नाही तर त्यांना बुद्ध धम्म समजला म्हणुनु ते बोधिसत्व आहेत असे नव्हे तर ते ज़िवनात प्रत्यक्ष आचरून आज़च्या बुद्धिस्ट समाजाला एक ज़िवंत एक व्यक्ति संस्था बोधिसत्व आम्बेडकर चेअर ( पीठ ) यास सुयोग्य व्यक्ति आज हयात आहेत त्यांचा समाज एकता राजकिय दिशानिर्देश हेवे दावे कमी करून अहंभाव अहंकार त्यागुन समाजाच्या नेत्यानी निदान बोधिसत्व ही ज़िवंत वेवस्था स्विकारावी आणी समाजाचा थांबलेला टूटलेला रथ मार्गी लावत रहावा म्हणुन नेटीव रूल मुव्हमेंट ने सूचवली अशी एक योजना आहे !
समाजात अजून बरेच विचारवंत , साहित्तिक , बौद्ध भीक्कु असतील पण प्रा. डॉ. भीमराव गोटे निछितच या बोधिसत्व पद , चेअर साठी सुयोग्य व्यक्ति आहेत !
काही लोकाना असे वाटणे शक्य आहे की त्यांचे कार्य बाबा साहेब सारखे मोठे आहे काय ? मी म्हणेन आहे आणी नाही कारण समाज गतिशिल राहिला पाहीजे क्रांती चे चक्र मग ते धार्मिक सामाजिक आर्थिक वा राजकिय सांसकृतिक असो त्यास फिरती ठेवणारी निर्गर्वी व्यक्तिस समाजाने पूढे रेटले पाहीजे इच्छेने की अनिच्छे पण समाजातिल व्यक्ति आहे वादातीत नाही तर पूढे करा !
अमबेडकरी नेत्यानो तुम्ही त्यांच्या घरी जावून एकते साठी बसू शकता , अहंकार एक ज़िवंत व्यक्ति पद निर्मांण करा जसे विदेशी यूरेशियन वैदिक ब्राह्मण चार चार पीठाचे शंकाराचार्य अनेक आचार्य महामण्डलेस्वर अनेक आखाड़े लाखो संस्था , हजारो सहकारी संस्था ,सर्व पक्षात शिरकाव वगीरे .युद्ध तंत्र वापरून ब्राहमानी सत्ता टीकवूण ठेवतात कुठला ब्राम्हण अश्या वेवस्थितिल नेमणुका निवाद पद वर चुकुन ही एक नकारार्थी शब्द काढ़त नही ती निती आपण समजून घ्या तर आज प्रा डॉ भीमराव गोटे हे शिव धानुष्य म्हणा हव तर धम्म चक्र म्हणा ते निच्छित पेलू शकतात !
बुद्ध धम्म धार्मिक मान्यतेत संसारी व्यक्ती लोकोत्तर धम्म कार्य करित असेल तर समाज त्यास बोधिसत्व म्हणत असे जसे बोधिसत्व तारा ,बोधीसत्व पद्मपाणी आदि ! एकाला त्याच्या कार्या मुले बोधिसत्व बोलले गेले असेल तर दुसरया ला देवू नये असे म्हणने योग्य ठरणार नाही बुद्धाने सुद्धा सांगितले आहे अत्त दीप भव ! एक बुद्धिस्ट म्हणुन प्रा. डॉ. भीमराव गोटे त्याच मार्गावर आहेत म्हणुन नेटीव रूल मुव्हमेंट ने त्यांना 2023 लाच बोधिसत्व विद्दयावाचस्पति प्रा .भीमराव गोटे संभोधुन गौरव केला आहे !
No comments:
Post a Comment