Sunday, 6 October 2024

Yashu la Suli var chadhaval jaate !

#यशु_ला_सुली_वर_चढवल_ज़ाते !

माझी अलाहबाद आई टी आई लिमीटेड ह्या टेलेफोन निर्मांण करणारी स्वतंत्र भारता ची पहिली केन्द्र सरकार अंडरटेकिंग मधुन मुंबई रिजनल ऑफिस , मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व शिपींग एंड क्लीअररंस ऑफिस व्ही टी च्या दोंन्ही ऑफिस चे ऑडिट करण्या साठी असिसटन्ट ऑडिट ऑफिसर म्हणुन बेंगालोर मुख्यालयातुन पोस्टींग झाली ! एडमिनीस्ट्रेटीव्ह रिपोर्टींग चीफ रिजनल मेनेजर , मुंबई ला आणी फंकशनल रिपोर्टींग बंगालोर च्या चीफ ऑडीट ऑफिसर ला ! 

म्हणजे माझी अवस्था आज च्या दिल्ली च्या मुख्य मंत्री केजरीवाल सारखीच , सीआरएम ला काम करू द्दायचे नाहिं , बंगलोर ला भ्रस्टाचार नको आहे !

मी सीआरएम ऑफिस मधे बसायचा अर्धा दिवस तिथे अर्धा दिवस व्ही टी एस सी ओ ऑफिस !

काही दीवस बरे गेले , मोटवानी सीआरएम होते इकदे डीसूजा नावाचे एस सी ओ होते !

मला आफिसर असोशियन चा अध्यक्ष बनविले गेले , बरे चालले होते , मी कल्याण पूर्व ला तिसगाँव नाक्यावर एक आग्री गायकवाड होते त्यांचे चालित माझे साले बाबुलाल मेश्राम होते एक खोली भाड्याने घेतली एक मित्र होते देवचन्द आम्बादे पूर्वी ते सुद्धा रेल्वे ऑडिट ला क्लार्क राहिले होते आमचे गाँव पवनी जवड च्या भीवापुर चे होते पण ते नंतर कामठि ला गेले होते ते माझे मित्र होते व नौकारी सोड़ून जागा घेणे प्लोट पाडणे , चाल बांधने विकणे असे बिल्डर झाले होते त्यांच्या अंम्बादे चालित काही नागपुर आणी जवडपास च्या 28 लोकानी 30 बाय 10 च्या प्रत्येकी 3 खोल्याचे कवलारू बांधकाम चे घर बाधली होती त्यात एेक दामके होते ते चेंबुर ला रहायचे त्यांची रुम मी आधी भाड्याने घेतली व नंतर विकत घेतली , आई , मिसेश दोंन मुल आम्ही असे कुटुम्ब होते , बाबुलाल माझे मोठे साले त्याच लग्न झाल , जवाहरनगर चे खापर्डे यांची मुलगी होती ते बाजूच्या चालितिल खोलित राहत असत ! नंतर दों आणी तिन नंबर चे साले सिद्धार्थ व बलराज हे सुद्धा कल्याण ला आले , मोठा भीवंडी ला शालेत शिक्षक म्हणुन लागला तर लहान बलराज पूढे नालंदा शालेत क्लार्क म्हणुन लागला !

ऑफिस च्या ओलाखी कल्याण च्या ओलखी वाढत गेल्या मुलाच्या इंग्रजी शाला एडमिशन फोर्म साठी कल्याण पूर्व च्या दोन शालेत रात्रभर नंबर लावला तरी एडमिशन मिलेंना वरुन दोणेशन वेगडे , तेव्हा मी एक संस्था काढून इंग्रजी शाला काढायचा निर्णय घेताला , 20 मित्र सदश्य असलेली बहुजन एज्यूकेशन फौण्डेशन ऑफ इन्डिया , कल्याण , समता हौसिंग सोसायटी , तिसगाव नाका , कल्याण पूर्व ही संस्था 19 86 स्थापन झाली , मी संस्थापक अध्यक्ष होतो ! एन एस जगझापे सचिव , के जी पाटिल , गोन्नाडे , मर्शाल बाई , जोधे , तलमले , दिपा राऊत , अरूण मेश्राम , एल एन खापर्डे आदी बहुजन समाजातिल लोक घेवुन पूढे 1987 मधे पेरियर रामास्वामी इंग्लिश स्कुल कल्याण पूर्व लोकग्राम गेट जवल मेश्राम च्या चार खोल्या भाड्याने घेवून श्री सूर्यवंशी , पप्पु बिल्डर्स आदि च्या उपस्थिती शुरू केली पहिला विद्दयार्थी माझा मुलगा हर्षल राऊत , दुसरा श्री संपत वंजारी चा मुलगा सोनू वंजारी ! डोनेशन फक्त 100 रूपये दूसरी कडे 10000 रूपये ! तरि पण विद्यार्थी मिलेंना !

विद्दयार्थी एकदम कमी , खर्च जास्त व्यस्त समिकरण अर्धा पगार यातच जायचा , मारिया मार्शल मुख्याध्यपिका ,जोशना मोरे अजून एक शिक्षिका, दिपा राऊत शिक्षिका आणी पाटिल बाई शिपाई , के जी पाटिल संस्था सदश्य विवसाय बुक बाइन्डीग , कल्याण हे संस्थे कड़ून व्यवस्थापक , आफिस ला जाण्या पूर्वी व परत आल्यवर मीच काय लागते काय नाही ते बघणार अशी आमची संस्था शाला शुरू असे !

कल्याण पूर्व ला सिद्धार्थनगर जवड जागृती मण्डलाची मराठी माध्याम शाला शुरू होती मी त्या संस्थेचा सुद्धा सभासद होतो , आम्बेडकरी विचारची ती चंगाली जूनी संस्था प्रख्यात होती , मी बहुजन एज्यूकेशन फौंडेशन ऑफ इन्डिया या संस्थेची पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कुल शुरू केली तर टी पी धनविजय जे पोस्टात कामाला होते त्यांनी मला माहित विचारून पालीभाषा समिती संस्था काढली व पूढे सम्राट इंग्रजी स्कुल दूसरी कडे दुसर्या वर्षी शुरू केली , देवचन्द आम्बादे जे जागृती मण्डलाचे अध्यक्ष राहिले होते त्यानी सुद्धा पूढे दूसरी कडे समता मराठी शाला काढली !

पूढे ऊपेन्द्र शेन्डे , आमदार नागपुर , रामदास आठवले , दादासाहेब रुपवते , मा म देशमुख आदि अनेक मान्यवर घरी , शालेत येवुन गेले ! शालेला बिना अनुदान तत्वावर कायम म्हणुन 4 पर्यंत सरकारी मान्यता मिलाली !

पूढे मी कबीर हिन्दी स्कुल काढू म्हणुन संस्थेतिल लोकासं सांगीतले व अनाथपिंड़क बालगृह घरा जवल एक खोली भाड्याने घेवुन स्वखर्चाने संस्थे साठी शुरू करतो सांगुन ते अनाथपिंड़क बालगृह समता सोसायटी येथे प्रा भीमराव गोटे व एडव्होकेट यांचे उपस्थितित 10 अनाथ मुल व एक आई मेश्राम बाई स्वायंम्पाकिण व दिपा राऊत अधिक्षक असे शुरू कले !

पूढे मला एम बी ए चे कॉलेज शुरू कारावे असे वाटले त्या साठी मी दादा साहेब रूपवते व दादा साहेब रा सू गवई यांना भेटलो , हे कॉलेज तर व्हावेच पण बहुजन स्वायत्त विद्दयापीठ व त्यात आम्बेडकर हा विचार शिकविण्या साठी गेस्ट प्राध्यापक म्हणुन सम्मती द्दयावी म्हणुन मी अनेकास पत्र पाढविले काहीनी शुभेच्छा पत्र सुद्धा पाठविले !

1970 पासुन शुरू झालेली माझी नेटीव्ह रूल ची संकल्पना मला स्वस्थ बसू देई ना ! हे काढ ते काढ अशी माझी अवस्था झाली होती , मुलभारतिय विचार मंच , ब्लु व्हिल क्रोस , नेताजी छात्र वाहीनी , सत्य हिन्दू धर्म सभा , सहकारी स्वउपयोग वस्तु भांडार , महाराष्ट्र रेशन उपभोक्ता संघ , अखिल भारतीय बौद्धविहार महासंघ , पीएच डी धारक असोशियेशन असे किती तरी समाज संघटणे चे उपक्रम उपाय मला सूचत होते , सूचवत होतो ते मुलभारतिय विचार मंच या 1989 - 90 मधे स्थापन केलेल्या वैचारिक वर्क मधे य़ाचे अनेक साक्षीदार असतील यातच माला प्रा भीमराव गोटे , विजय विसपूते सारखे चांगले घनिष्ठ मित्र पूढे 1992 -93 मधे स्थापित नेटीव्ह पीपल्स पार्टी साठी मिलाले , मी पक्षाध्यक्ष , प्रा भीमराव गोटे , महामंत्री , विजय विसपूते , कोषाध्यक्ष !

मी केन्द्र सरकार च्या उपक्रमात म्हणजे आई टी आई लिमीटेड मधे मुम्बई ला अकाऊंटस् ऑफिसर होतो ! 

माझे काम माज्या समाजातिल अनेक लोकांस पसंद नव्हते कारण मी नेटीव्हीस्ट होतो ,नेटीव्हीझम व नेटीव्ह हिन्दुत्व हा विचार मी 1970 पासुन मांडला होता त्या वेली सुद्धा मी नेटीव्ह हिन्दूधर्म आणी विदेशी वैदिक ब्राह्मिणधर्म अलग अलग आहेत हे सांगित होतो , जनेऊ छोडो भारत जोडो ! विदेशी ब्राहमिण भारत छोडो ! हा नारा देत होतो ! पूढे नेटीव्ही पीपल्स पार्टी च्या तिकिटा वर ,कुलूप किल्ली या चिन्हा वर उल्हासनगर मधुन पप्पु कालानी आमचे आमदार आहेत हे काही लोकासं खरेच वाटत नव्हते !

काही लोक राऊत पागल आहे रोजच एक नविन नविन संस्थाl काढ़तो , नेटीव्हीझम , नेटीव्ह हिन्दुत्व हे नविनच खुड आणल अस म्हणत असत !

 ऑफिस मधे वरिष्ठ अधिकारी च्या सम्मतिने काही भ्रस्टाचार चालित असे ते ऊघडकिस केलेले लोकाना आवडत नसे तेव्हड्यात आमच्या कंपनी ने अहमदाबाद सबऑफिस चे रिजनल ऑफिस करायचे ठरविले , मला इच्छा आहे का न विचारता मला मुंबईहुन अहमदाबाद रीजनल ऑफिस ,मणीनगर अहमदाबाद ला बदली ची ऑर्डर दिली तेव्हा मी मुंबई रीजन ऑफिसर असोसीयेशन चा अध्यक्ष होतो , माझे कुटुम्ब कल्याण ला सेटल झाले होते मी एक शिक्षण संस्था चालवितो , सामाजिक कार्य करतो हे सर्व माहित असुन मला ट्रांसफर करू नका म्हणुन ऑफिसर असोशियन ने तार केली , माज्या एवाजी नविन आलेला ज्यूनीआर असलेला असीस्टन्ट अकाऊंटस ऑफिसर पाठवा असे पत्र सुद्धा लिहले तरी काही फायदा झाला नाही ! मी मला प्रामिशन द्या काही इंकरीमेंट द्दया अशी मागणी केली कारण नविन युनिट मनकापुर ला लोकाना प्रमोशन , इंकरीमेंट देवून , इंटरनल जाहीरात काढून लोकांच्या सहमतिने कंपनी ने भारती केली होती ! पण समाज सेवा , ऑफिसर असोशियेशन चा आवाज ,भ्रस्टाचार विरोधि व्यक्ति ला शिक्षा झालिच पाहीजे , यशु ला सुली वर दिलेच पहीजे त्या शिवाय वेवस्था कशी खुश होणार ?

मी शेवटी नाईलाजाने अहमदाबाद ला गेलो ,ऑफिस मणीनगर ला होत , तिथ्रे जवलच एक परमार कुटुम्ब होत त्यांच्या कडे एक खोली पहिल्या मजल्यवार भाड्याने घेतली जेवण मणीनगर चौकात एक पंजाबी होटेल होत तिथे करित असो !

अरूण मेश्राम जे अलाहबाद ला होते पूढे एम एस ई बी , मुम्बई बान्द्रा ऑफिस ला लागले त्यांची सासुरवादी अहमदाबाद मणी नगर चीच होती !

नविन कार्याल्यात रीजनल मेनेजर म्हणुन दिल्ली वरुन गुप्ता त्याच ग्रेड वर आले होते त्यांना बीपी शुगार चा त्रास होता ते दिल्लिला सेटल होते त्यांना ही ट्रसफर नको होती ! एक दंडयुद्धपाणी ग्रेड 3 इंजीनीआर बंगलोर वरुन ट्रसफर करून पठवले होते दों नव भारती चे एच पी सिंग आणी इंजीनीअर शिव प्रकाश हे ग्रेड 2 ऑफिसर होते , सब ऑफिस चे इनचार्ज़ शशीकुमार नुक्ताच स्टाफ़ मधुन प्रमोशन होवून ग्रेड 1 इंजीनीअर होते ! शशीकुमार पोलीओ मुले एका पायाने अपंग होता , काठी घेवुन चालायचा केरली ब्राह्मिण होता बाहेर सगड खायचा त्याला एक मुलगा होता एक मुलगी दोघे शिकत होते त्याचे कुटुम्ब मनमिलावू होते एक दोन दा त्याने घरी जेवायला नेले होते विषेश म्हणजे केरली पद्धतिच छान जेवण होत !

शिवप्रकाश कानडी लिंगयात होता लग्न झाल नव्हत एकटा एक खोली घेवून राहत होता , दंडयुद्धपाणी चे लग्न झाले होते एक मुलगी होती तो आपले कुटुम्ब घेवून एका खोली वर राहत असे तो सुद्धा कानदी होता ! आम्ही मणीनगर ला जवल पास राहत होतो , प्रकाश शिव ने कुठनतरि ड़बा लावला होता ! गुप्ता साहेबानी लाम्ब खोली घेतली होती !

 गुप्ता साहेब आणी मी दर आठ पंधरा दीवसाने आपल्या घरि ज़ात असू दोघे ही बंगलोर च्या ड़ी जी एम ला शीव्या देत असू तो नविन मिलिटरी तुन रिटायर्ड ब्रीगेडअर व डिसीफ्लींन साठी ओलखला ज़ात होता  

एच पी सिंग बिहार चा भुमिहार होता नविनच लग्न झाल होत बायको बरोबर एक नौकार शुद्धा घेवुन आला होता तो जरा लांब च्या एरियात राहत होता , एम बी ए होवून ग्रेड 2 वर परसोनल एडमिन ऑफिसार म्हणुन पहिल्यांदाच लागला होता तो एल पी शाही कोंग्रेस खासदार चा नातेवाईक आहे असे सागत असे !

मी अरूण मेश्रांम च्या सासरय़ाना भेटलो त्यांच घर मणीनगर चौका जवल होते , चहा पाणी आग्रहाने केला त्यानचे एक नातेवाईक गजबे सुद्धा अहमदाबादलाच रहात होते त्यांना तीन मुल आहेत शिकत आहेत समजल ! बर वाटल त्यानी सांगीतले अहमदाबाद ला खूप कपडा मील आहेत त्या मुले खूप मराठी लोक अहमदाबाद ला आहेत , मराठी मण्डल आहे , गणपती उत्साव मोठया उत्साहाने साजरा केला जातो !
मणीनगर ला खुद्द मराठी लोकांची खूप संख्या आहे ! रबारी , परमार , वाघरी , शाह जैन , हिन्दू शाह , मुस्लिम , पटेल अशी विविध लोक आहेत ! साउथ इन्डीयन लोक मणीनगर ला मोठी शाला चालवित असत !

नविन आफिस ला कंपनी ने एक एंबेसेडर कार व टेंपररी ड्रायवर दिला होता ती कार रिजनल मेनेजर वापृत असे व घरी पारकिंग करित असे , हे आफिस लहान आहे असे समजुन आश्रम रोड ला टावर मधे मोठे ऑफिस घ्यावे असे कंपनी ने ठारविले ! 

मी अल्लाहबाद ला असताना बजाज प्रिया बुक केली होती मी अहमदाबाद ला आलो तेव्हा 6 - 7 वर्षाने माझा नंबर लागला होता इताकी प्रिया चेतक ला ड़ीमाड होती ! पीवड्या रंगाची प्रिया स्कुटर घेतली होती !

आमच्या ऑफिस ला काही स्टाफ हवा होता , ऑफिस ला शिपाई पाहीजे होता मला अरूण मेश्राम चे सासरे गजबे चे मुल बद्दल बोलले होते , बाबूराव गजबे 8 वी की 10 वी झाले होते मी बोलावून घेतले , सर्वांना बरा वटला डेली वेजेस वर घेतले , त्याला सर्व बापू म्हणत असत अकाऊंटस , एडमिनला क्लार्क लागत होते , बापू चा मोठा भाउ बि कोम शिकत होता त्याच नाव गिरधर गजबे हे सेकंड इयर ला होते मी म्हटल या ड़ेलीवेजेस वर मी सांगतो कामाची चिंता करू नका अनुभव मिलेल ! गिरधर अकाऊंटस् क्लार्क म्हणुन लागले दोन मुली सुद्धा घेतल्या !

पूढे गिरधर गजबे बी कोम झाले , पूढे भाभा केंसर होस्पिटल ला क्लार्क म्हणुन लागले तीथुन ते महिला विद्दापीठ , मुबई ला असीस्टंट ते क्लास 1 अधिकारी ड़ेप्यूटी रज़िष्ट्रार पद पर्यंत पोहचले याचे समाधान तर आहेच पण त्यांच्या कठोर परिश्रामाला सलाम ! त्यांचे लाहन बंधु बापू पुढे मिलिटरी मधे गेले , बी ए झाले व निवृत्ती नंतर बेंकत क्लार्क म्हणुन लागले त्यांची ही प्रगती वाखानण्या सारखी आहे !

#दौलत_डोमाजी_राऊत

No comments:

Post a Comment